स्वदेशी लस नको रे बाबा; का घडले असे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- कोरोना काळात देशातील डॉक्टरांनी बजावलेली भूमिका हि अत्यंत महत्वाची होती. किंबहुना कोरोना असेल व नसेल हा संशय दूर करण्याची जबाबदारी देखील त्यांनी अत्यंत चांगल्या मार्गाने हाताळली.

परंतु आता डॉक्टरांच्या विशिष्ट मागणी मुळे सरकार गोंधळा मध्ये पडले आहे. मेडिकल केंद्रावर पुण्याच्या सिरम इंस्टिट्युटने तयार केलेली ऑक्सफोर्डची लस नसल्याचे कळताच काही डॉक्टरांनी लस घेण्यास आपला नकार कळवला.

काही डॉक्टर तर केंद्रावरून लगेच आल्या पावलांनी मागे सुद्धा गेले. या डॉक्टरांमध्ये काही महिला डॉक्टर होत्या. १०० पैकी ५३ जणांनी लसीकरण करून घेतले.

नागपूर मेडिकल चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा लस घेण्यासाठी आले होते,परंतु पोटाचा आजार असल्याने त्यांनी आज लस घेण्यास नकार दिला. दोन ते तीन दिवसानंतर ते लास घेतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळी १०. ३० च्या सुमारास कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. नागपूर मध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आणि नंतर लगेच काहींनी लस घेण्यास नकार दिला.

भारत बायोटेक निर्मित लस केंद्रावर देत असल्याने काही डॉक्टरांनी त्यास नकार दिला आणि सिरम इंस्टिट्युटच्या लसीची त्यांनी मागणी केली.

राज्यामधील सहा केंद्रांवर हैद्राबाद येथील भारत बायोटेक च्या कोव्हॅक्सीन चा पहिला डोस देण्यात आला होता. यातील नागपूर मेडिकल केंद्र हे एक केंद्र होते.

अहमदनगर लाईव्ह 24