अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : टाटा मोटर्स कंपनीने आपल्या नेक्सॉन एसयूव्ही कारची इले्ट्रिरक आवृत्ती भारतीय बाजारात मंगळवारी दाखल केली. भारतात या कारची एक्सशोरूम किंमत १३.९९ लाख रुपये ठेवण्यात आली असून ही सर्वात स्वस्त इले्ट्रिरक एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे.
टाटा मोटर्स कंपनीने टाटा टिगोरनंतर सादर केलेली ही दुसरी इले्ट्रिरक कार आहे. टाटाची इले्ट्रिरक नेक्सॉन बाजारात ह्युंदेई बोना ईव्ही, आणि एमजी झेडएस ईव्ही या वाहनांशी स्पर्धा करणार आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सएम, एक्सझेडप्लस, एक्सझेड प्लस लक्सट्रीम्स अशा प्रकारात उपलब्ध आहेत. एक्सएम मॉडेलची किंमत १३.९९ लाख रुपये, एक्सझेड प्लसची किंमत १४.९९ लाख रुपये तर एक्सझेड प्लस लक्सट्रीम्सची किंमत १५.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
या कारमध्ये झिप्ट्रॉन पॉवरट्रेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हे तंत्रज्ञान टाटा मोटर्सने स्वत: विकसित केले आहे. कार ३०.२ केडब्ल्यूएच लिथिअम आयन बॅटरीवर धावेल.
कारला आठ वर्षांची अथवा १.६ लाख किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर ३१२ कि.मी. अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे.