Tata Tigor EV Vs Citroen eC3 : भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार आल्या आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा सुरु झाली आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारमध्ये नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स देत आहेत.
पण सध्या बाजारातील Citroën eC3 आणि Tata Tigor EV या कारमध्ये टक्कर सुरु आहे. दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धम्माल फीचर्स देण्यात आले आहेत. पण टाटा Tigor EV मध्ये Citroen eC3 पेक्षा धमाकेदार १० फीचर्स देण्यात आले आहेत.
टाटा Tigor EV आणि Citroen eC3 वैशिष्ट्ये
1- Tigor EV च्या टॉप व्हेरियंटला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) मिळते तर Citroen eC3 या कारला हे वैशिष्ट्य मिळत नाही.
2- Tata Tigor EV च्या टॉप व्हेरियंटला वॉशर आणि डिफॉगरसह रियर वायपर मिळतो. Citroen eC3 या कारला वॉशर आणि डिफॉगर रियर वायपर मिळत नाही.
3- Tigor EV च्या टॉप व्हेरियंटमध्ये 4 स्पीकर आणि 4 ट्वीटरसह Harman Kardon साउंड सिस्टम आहे तर Citroen eC3 मध्ये 4 स्पीकरसह अनब्रँडेड ऑडिओ सिस्टम आहे.
4- टॉप-स्पेक टिगोर ईव्हीला ऑटो-फोल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक-अॅडजस्टेबल ORVM मिळतात. eC3 मॅन्युअल ORVM (अॅडजस्ट आणि फोल्ड) सह येतो.
5- ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल टिगोर ईव्हीच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे तर मॅन्युअल क्लायमेट कंट्रोल eC3 मध्ये उपलब्ध आहे.
6- Tigor EV चा टॉप व्हेरियंट क्रूझ कंट्रोलसह येतो पण eC3 मध्ये क्रूझ कंट्रोल उपलब्ध नाही.
7- Tigor EV च्या टॉप व्हेरियंटला कीलेस एंट्रीसह पुश-बटण स्टार्ट/स्टॉप मिळते पण eC3 रिमोट कीलेस एंट्री आणि पारंपरिक कीलेस इग्निशन सिस्टमसह येते.
८- Tigor EV चे टॉप व्हेरियंट ऑटो टर्न/ऑफसह प्रोजेक्टर हेडलाइट्ससह येते तर eC3 मॅन्युअल रिफ्लेक्टर हॅलोजन हेडलाइट्ससह येते.
९- टिगोर ईव्हीच्या टॉप व्हेरियंटमध्ये रेन सेन्सिंग वायपर उपलब्ध आहेत. हे वैशिष्ट्य eC3 मध्ये देखील उपलब्ध नाही. eC3 ला मॅन्युअल वाइपर मिळतात.
10- Tigor EV च्या टॉप व्हेरियंटला कप होल्डर आणि लेदरेट सीटसह मागील सीट सेंटर आर्मरेस्ट मिळते तर eC3 टॉप व्हेरियंटला फॅब्रिक सीट्स देखील मिळतात आणि मागील आर्मरेस्ट नाही.