Income Tax : जर तुम्हीही कर भरण्यास पात्र असाल आणि तुम्ही कर भरला असेल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत. कर भरल्यानंतर अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते अन्यथा तुम्हाला पुन्हा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कर भरताना काळजीपूर्वक भरावा.
आजकालच्या ऑनलाईन युगात कर भरणेही ऑनलाईन झाले आहे. कर भरताना अनेक गोष्टी समजून कर भरावा. ऑनलाईन पद्धतीने कर भरताना तुम्हाला अनेक अडथळे येऊ शकतात.
ई-फायलिंग
ऑनलाईन कर भरत असताना त्याचे ई-फायलिंगही करता येत आहे. घरात बसून किंवा इतर कुठूनही कर भरता येऊ शकतो. ऑनलाईन पद्धत आल्यामुळे खूप कमी वेळात आयकर भारत येत आहे. आयकर विवरणपत्र भरल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
इन्कम टॅक्स रिटर्न कसे डाउनलोड करावे?
आयकर भरण्यासाठी केंद्र सरकारकडून काही कालावधी दिला जातो त्याअगोदर आयकर भरणे बंधनकारक आहे. दिलेल्या कालावधीनंतर आयकर भरलायनानंतर तुमच्यकडून दंड आकारला जातो.
एकदा तुम्ही तुमचा ITR दाखल केल्यावर, आयकर विभागामार्फत एक आयकर पडताळणी फॉर्म तयार केला जातो जेणेकरून करदात्याला ई-फायलिंगची वैधता सत्यापित करता येईल. तुम्ही डिजिटल स्वाक्षरीशिवाय तुमचे रिटर्न भरले असेल तरच हे लागू होतात.
आयकर परतावा पडताळणी फॉर्म
आयकर भरल्यानंतर, प्राप्तिकर रिटर्न पडताळणी फॉर्म देखील डाउनलोड करावा. हा फॉर्म सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. यासाठी इन्कम टॅक्स इंडियाच्या वेबसाइटवर लॉग इन करा. तेथे ‘व्ह्यू रिटर्न/फॉर्म’ पर्यायावर क्लिक करून ई-फाइल केलेले कर रिटर्न पहा.