Tax Saving Schemes : टॅक्स धारकांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवायचा असेल तर लवकरात लवकर करा हे काम, होईल लाखोंची बचत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tax Saving Schemes : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तर नवीन आर्थिक वर्ष चालू होण्याअगोदर अनेकांना मार्चच्या शेवटच्या दिवसांमध्ये मोठी आर्थिक कामे असतात. जर तुम्हीही टॅक्स भरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

सरकारकडून गुंतवणूकदार आणि दीर्घकालीन बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना देशातील नागरिकांसाठी आणल्या आहेत. त्यामुळे कर भरणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. टॅक्स धारक या योजनांमध्ये गुंतवणूक करून टॅक्सचे पैसे वाचवू शकतात.

केंद्र सरकारकडून 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार या योजना कर लाभ देखील देतात. NSC, SCSS, SSY, आणि PPF हे पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा टॅक्स धारकांना होत आहे.

जर तुम्हालाही तुमच्या टॅक्सचे लाखो रुपये वाचवायचे असतील तर तुम्हाला ३१ मार्चपर्यंत काही काम करावे लागेल. तुम्हाला आयकर कलम 80C, 80CCC आणि 80CCD (1) अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो.

जर तुम्ही PPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी या सरकारच्या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे तुमचा टॅक्स देखील वाचू शकतो. कलम 80C अंतर्गत १.५ लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्ही कर बचत करू शकता.

कलम 80C अंतर्गत तुम्ही PPF योजनेमध्ये एका वर्षांमध्ये किमान ५०० रुपये ते कमाल १.५ लाख रुपये गुंतवणूक करू शकता. १५ वर्षाच्या मुदतीनंतर तुम्हाला या पैशांवर ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ दिला जाईल.

करदाते कलम 80C अंतर्गत ELSS, PPF, NPS, EPF, कर-बचत एफडी आणि इतर योजनांमध्ये गुंतवणूक करून 1,50,000 रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा फायदा घेऊ शकतात.

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणे हा कर वाचवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग आहे. करदाते कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या एकूण मर्यादेपेक्षा 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कर कपातीचा फायदा घेऊ शकतात.