ठरलं! ‘ह्या’ महिन्यात सुरु होईल कोरोना लशीकरण; सरकार करणार ‘इतका’ खर्च

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-कोरोनाला पराभूत करण्यासाठी जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लसींना पुढील काही आठवड्यांत तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळू शकेल. दोन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे.

क्लिनिकल ट्रायल्सच्या आणखी सहा लसी प्रगत अवस्थेत आहेत. आतापर्यंत भारतातील 1 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दुसरीकडे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, ऑगस्टपर्यंत केंद्र सरकार 30 कोटी लोकांच्या लसीकरणावर 13,000 कोटी रुपये खर्च करेल.

पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. बिहार आणि केरळ सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांना ही लस विनामूल्य मिळण्याची घोषणा केली आहे.लवकरच इतर राज्येही अशी घोषणा करू शकतात.

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी 60 करोड़ डोस :- पहिल्या टप्प्यात भारताला 60 करोड़ डोसची आवश्यकता आहे. मार्च पर्यंत 50 करोड़ डोस तयार करणार असल्याचे सीरम संस्थेने म्हटले आहे.

सीरमने देखील या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. भारत बायोटेकचा कोवाक्सिनही या शर्यतीत पुढे आहे.

16 कोटीहून अधिक टेस्ट झाल्या असून त्यामध्ये 6.25% लोक संक्रमित झाले :- देशातील 16 कोटीहून अधिक लोकांची चाचणी पूर्ण झाली आहे.

यापैकी 1 करोड़ 4 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. चांगली गोष्ट म्हणजे 95 लाख 49 हजार 923 लोक यामधून बरे झाले आहेत. संसर्गामुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 45 हजार 171 वर गेली आहे.

गेल्या 18 दिवसातील आकडेवारी पाहिल्यास 1.20 लाख सक्रिय प्रकरणे कमी झाली आहेत. आता फक्त 3 लाख 7 हजार 97 रुग्ण बाकी आहेत ज्यांवर उपचार चालू आहे.

गेल्या 24 तासांत देशात 26 हजार 991 नवीन रुग्ण आढळले आणि 29 हजार 879 लोक बरे झाले. 342 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे कोविड covid19india.org वरून घेतले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24