Categories: भारत

मला इच्छा-मृत्यू पाहिजे म्हणणारी ती अभिनेत्री मृतावस्थेत सापडली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-बिग बॉसमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया सोमवारी दुपारी मृतावस्थेत सापडली. बंगळुरुतील वृद्धाश्रमात तिचा मृतदेह आढळला.

हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याचा सामना करत होती. तिने तिच्या सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचेही संकेत दिले होते.

तिचा मृतदेह पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला. जयश्री गेल्या काही दिवसांपासून नैराश्याशी झुंजत होती. बंगळुरुच्या संध्या किरण आश्रमात तिच्यावर उपचार सुरु होते.

जयश्री बिग बॉस सिझन तीनची स्पर्धक होती. तिने अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे जयश्री गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याने नैराश्यात असल्याती माहिती समोर येत आहे.

तिने एकदा फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्ह दरम्यान तिने “आपण आणखी जास्त नैराश्याचा सामना करु शकत नाही”, असं ती म्हणाली होती. त्याचबरोबर “मला इच्छा-मृत्यू पाहिजे”, असंदेखील जयश्री म्हणाली होती.

मागच्यावर्षी २०२० मध्ये नैराश्याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले. २२ जूनला जयश्रीने तिच्या फेसबुकवर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते.

‘गुडबाय’ असे तिने एफबी पोस्टमध्ये म्हटले होते. पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली व ‘मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल’ असे लिहिले होते.

अहमदनगर लाईव्ह 24