अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- आता प्रत्येक रेल्वे स्थानकात केवळ मातीच्याच भांड्यात चहा मिळणार आहे. कारण प्लास्टिकचे कप आता स्थानकात दिसणार नाहीत. ही घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यांनी 15 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मातीच्याच भांड्यात चहाची सुरवात केली होती. पण प्लास्टिक आणि कागदाच्या कपांनी अतिक्रमण केले.
गोयल म्हणाले की, आता भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकात चहा प्लास्टिक कपऐवजी इको फ्रेंडली कपांमध्ये विकला जाईल. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ढीगवाड़ा रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते.
उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत नव्याने विद्युतीकरण झालेली ढीगवाड़ा-बांदीकुई सेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रेल्वेमंत्री म्हणाले की सध्या देशातील सुमारे 400 रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीने चहा देण्यात येत आहे. भविष्यात देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर केवळ मातीच्याच भांड्यात चहा विक्री करण्याची आमची योजना आहे.
हा उपक्रम प्लास्टिक फ्री इंडियाच्या दिशेने रेल्वेचे योगदान आहे. या उपक्रमातून पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि लाखो लोकांना त्यातून रोजगार मिळू शकेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved