Categories: भारत

बॉलिवूडच्या ‘ह्या’ जोडीने भाड्याने घेतलाय बंगला; भाडं ऐकून चक्रावेल डोके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांच्या यादीत असलेलं एक कपल म्हणजे रिचा चड्ढा आणि अली फजल. रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी नुकतंच जुहूमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे.

जुहू परिसरात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठे कलाकार राहतात. रिचा-अलीने पंधरा दिवसांपूर्वीच हा बंगला तीन वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचं भाडं पहिल्या वर्षासाठी ३ लाख रुपये प्रती महिना इतका आहे.

तर दुसऱ्या वर्षी बंगल्याचं भाडं वाढून ३.१५ लाख रुपये प्रती महिना होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी ३.३० लाख रुपये प्रती महिना भाडं त्यांना द्यावं लागणार आहे.

रिचानं ‘ओये लकी! लकी ओये’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने गँग्ज ऑफ वासेपूर १ आणि २ , फुक्रे यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या. मात्र ‘मसान’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. त्यानंतरही सरबजीत, आर्टिकल ३७५ यासारखे तिचे चित्रपट गाजले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24