लंदशहर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. परंतु या लॉक डाऊनमध्ये महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार बुलंदशहरमध्ये घडला आहे.
गावातील दोन तरुणांनी दारूच्या नशेत एका युवतीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली परंतु तिची तक्रार नाकारल्याने या छेडछाडीचा व्हिडिओच पीडितेने सोशल मीडियावर शेअर केला.
त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली मग पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी पीडित तरुणी शेतातून परत जात असताना हा प्रकार घडल्याचं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. तिने असा आरोप केला आहे की, त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या गावातील दोन तरुणांनी तिला वाटेतच थांबवलं आणि तिचा विनयभंग करण्यास सुरवात केली.
त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपींनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरड झाल्यामुळे शेजारी स्थानिक लोक तात्काळ धावत आले.
गावकऱ्यांना पाहून आरोपींनी पळ काढला आणि जाताना पीडितेला जीवे मारण्याची धकमी दिली. यानंतर पीडितेने धावत पोलीस स्टेशन गाठलं पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.
त्यानंतर पीडितेने हाती लागलेला छेडछाडीचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर पोस्ट केला.