अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- सोनू सुदचे नाव खूप चर्चेत असते. लॉकडाऊन मध्ये त्याने मजुरांना बहुमोल मदत केली. आता पण तो त्याच्या परीने होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.मुंबईतील जुहूच्या परिसरात त्याची इमारत आहे.
तेथे बेकायदा बांधकाम आणि इमारतीतील रूमचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्यामुळे त्याच्यावर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोनू सूदने या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल केला.
त्यावर बुधवारी न्यायालयाने निकाल देताना याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.सोनू सूद याने पालिका आपल्यासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे.शक्तिसागर नाही इमारत १९९२ पासून उभी आहे.
ती बेकायदा नाही.त्याने ही इमारत २०१८-१९ ला विकत घेतली. तशी कागदपत्रे त्याच्याकडे आहेत. त्याच्या सांगण्यानुसार त्या इमारतीच्या माध्यमातून येणार पैसे तो समाजसेवेसाठी वापरतो.त्याने कोरोनाच्या काळात ही इमारत पोलिसांना राहण्यासाठी दिली होती. सरकारी जेष्ठ वकील अनिल साखरे यांनी तपास केला.