अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- काही दिवसांपूर्वी ब्रिटन येथे कोरोनाच्या नव्या रूपाने जन्म घेतला. या नव्या स्ट्रेन चा प्रसार झपाट्याने होत आहे. ब्रिटन येथून येणाऱ्या सर्व विमानांना नो एन्ट्री चा बोर्ड दाखवण्यात आला आहे.भारत सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानांना प्रवेश नाकारला आहे.
तरी देखील, हा नियम लागू होण्यापूर्वी गेल्या महिन्याभरात 30 हजार नागरिक ब्रिटन मधून भारतात आले आहेत. नुकताच भारतात सुद्धा हा कोरोनाचा प्रकार आढळून आला आहे. सुरवातीला 6 जण या विषाणूच्या कचाट्यात सापडले. आता हा आकडा 20 वर गेला आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 2 वर्षांच्या मुलीला मंगळवारी या विषाणूचा संसर्ग झाल्याच उघड झाल होत. ब्रिटनमधून आलेल्या सर्व नागरिकांची जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी एन सी डी सी दिल्लीमध्ये 14, कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 7, एन आय व्ही पुणे इथं 50 निमहंसमध्ये 15, आय आय जी बी मध्ये 6 सह एकूण 107 सॅम्पलची तपासणी झाली.
यामध्ये दिल्लीमध्ये 8 कोलकाता जवळच्या कल्याणीमध्ये 1 निमहंसमध्ये 2, एनआयव्ही पुणे इथ 7 आणि अन्य दोन लॅबमध्ये 2 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.पुण्यात कोरोना आल्यामुळे महाराष्ट्रात पण नवीन रुग्ण सापडू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घाबरून न जाता, प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज! आरोग्य विभागासमोर सद्ध्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. हा नवा स्ट्रेन कोरोनाच्या विषाणू हून जास्त वेगाने प्रसार करणारा आहे. थोड्याच काळात 20 जण याने बाधित झाले आहेत.
त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहेm आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून सामान्य नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. सुरक्षित अंतर राखून, चेहऱ्याला मास्क लावून व्यवहार करावे आणि सतत हात निर्जंतुक करत राहावेत.
सध्या हीच गोष्ट आपल्या हातात आहे. आपण आपली काळजी घेतली तर आरोग्य यंत्रनेवर ताप येणार नाही.