अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कुटुंबातील व्यक्तीच्या जाण्यामुळे शोकसागरात बुडालेल्या कुंटुंबिय बसलेले असताना अचानक दरवाजा वाजला. दरवाजा उघडल्यावर समोर जे दिसले ते पाहून कुटुंबिय एकदम गोंधळून गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्योपूर येथे एक बेवारस मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल केली.
यानंतर या कुटुंबीयांनी आपला भाऊ मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगीतले. यानंतर कुटुंबियांनी हा मृतदेह आपल्या भावाचा असल्याचा दावा केला.
सर्व कायदेशीर कारवाई करुन कुटुंबियांनी हा मृतदेह ताब्यात घेतला.यानंतर सकाळी कुटुंबियांनी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, रात्री या कुटुंबातील बेपत्ता व्यक्ती घरी परत आली.
मृतदेहाची व्यवस्थित ओळख न पटवता या कुंटुंबियांनी अनोखळी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे पोलिसांनी सांगीतले. आपल्या घरातील बेपत्ता वक्ती घरी परतल्याने दु:खात बुडालेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.