मुंबई सध्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्रही बंद आहे. हे सर्व खेळाडू सध्या घरातच वेळ घालवत असून बऱ्याचदा शोधलं मीडियावर गप्पा मारत असतात.
असच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि विराट कोहली इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारत असताना विराटने एक खुलासा केला आहे.
कोहली म्हणतो, टीममध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता. विराट त्यावेळी उत्तम खेळाडू होता, तरिदेखील त्याचं टीममध्ये सिलेक्शन करण्यात आलं नव्हतं.
विराटने सांगितलं की, त्यावेळी स्टेट क्रिकेटमध्ये अनेक अप्रिय गोष्टी घडत होत्या. विराटने सांगितलं की, ‘त्यावेळी माझ्यासोबतही अशीच एक घटना घडली होती.
ज्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं तिरीही त्याव्यतिरिक्तही तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. माझे वडील ‘प्रेम’ फार मेहनती होते, जी व्यक्ती मेहनत करते,
त्या व्यक्तीला लाच देण्याघेण्याची भाषा कधीच समजत नाही. त्याच्या वडिलांचा शॉर्टकटवर कधीच विश्वास नव्हता. ते नेहमी मला मेहनत कर आणि स्वतःवर विश्वास ठेव, एवढचं सांगायचे.
त्यांनी माझे कोच होते त्यांना सांगितलं होतं की, ‘जर विराट स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटने खेळणार असेल, तर मी चुकीचं असं काहीही करण्यासाठी तयार नाही.
‘ त्यानंतर जेव्हा माझं टीममध्ये सिलेक्शन झालं नव्हतं त्यावेळी मी खूप रडलो होतो. प्रत्येकाने मेहनत करावी आणि मेहनतीच्याच जोरावर आदर आणि पैसे कमवावे असा सल्लाही विराटने यावेळी दिला.