India’s First Hydrogen Railway:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता जगामध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेले आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण अनेक रस्ते प्रकल्प बघितले तर या रस्ते प्रकल्पामध्ये वापरण्यात येत असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आता जमिनीखालून भुयारी मार्ग तसेच पाण्याखालून भुयारी मार्ग, मोठमोठे उड्डाणपूल यासारख्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत.
तसेच रेल्वे प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू असून वंदे भारत ट्रेनची सुरुवात प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी ठरत आहे.
अगदी याचा पुढचा टप्पा म्हणून आता भारतात देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे सुरू होणार आहे. ही रेल्वे डिसेंबर ते जानेवारीमध्ये सोनीपत ते जिंद या 90 किमी अंतरामध्ये धावणार असून ही संपूर्णपणे प्रदूषणमुक्त रेल्वे असणार आहे.
देशात धावणार पहिली हायड्रोजन रेल्वे गाडी
भारतामध्ये पहिली हायड्रोजन रेल्वे आता धावण्यासाठी सज्ज झाली असून डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये सोनीपत ते जिंद दरम्यान 90 किमी अंतरासाठी ही रेल्वे धावणार आहे.
ही पहिली प्रदूषणमुक्त रेल्वे असणारा असून या 90 किमी अंतराकरिता डिझेल रेल्वे 964 किलो कार्बन उत्सर्जित करते. या रेल्वेसाठी जिंद रेल्वे स्थानकावर तीन हजार किलो हायड्रोजन स्टोरेज करता येईल असा प्लांट तयार करण्यात येत आहे.
तसेच या रेल्वेला दर तासाला चाळीस हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असून जिंद रेल्वे स्थानकावर भूमिगत स्टोरेजची व्यवस्था तयार केली जात आहे.. छतावर जे काही पाणी साचत जाईल ते पाणी भूमिगत स्टोरेजच्या ठिकाणी पोहोचेल.
या हायड्रोजन रेल्वेला आठ ते दहा डबे असणार असून या आर्थिक वर्षांमध्ये ही रेल्वे नियमितपणे सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रेल्वेचे डबे चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार होत असून ते डिसेंबर पर्यंत तयार होतील.
जगाच्या पाठीवर जर बघितले तर स्वीडन, चीन तसेच जर्मनी आणि फ्रान्स यानंतर आता भारत हा जगातील पाचवा हायड्रोजन रेल्वे चालवणारा देश ठरणार आहे.
भारतामध्ये पहिल्या टप्प्यात दोन गाड्या धावू शकतात व त्यांचा वेग ताशी 140 किलोमीटरचा असणार असून मायलेज जर बघितले तर एक किलो हायड्रोजन साडेचार लिटर डिझेलच्या बरोबरीचे मायलेज यामध्ये देईल.
हायड्रोजन सेलच्या माध्यमातून रेल्वेमध्ये तयार होणारी वीज
या रेल्वेमध्ये इंधन सेल बसवले जाणार असून ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिश्रण करून वीज निर्माण करतील. या विजेचा वापर रेल्वेची मोटर्स आणि चाके चालवण्यासाठी केला जातो.
या रेल्वेमध्ये धुरा ऐवजी पाणी सोडले जाईल.हायड्रोजन रेल्वे हायड्रोजन इंधन सेलच्या माध्यमातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून विजेची निर्मिती करेल व ही रेल्वे 360 kg हायड्रोजन वर 180 किमीचा टप्पा पार करेल. या रेल्वेला दहा डबे असणारा असून हे डबे ओढण्याकरिता 2.4 मेगावॉट विजेची गरज लागेल.
या रेल्वेमध्ये दोन पावर प्लांट असतील. या रेल्वेची ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये माथेरान हिल रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका सिमला रेल्वे, कांगडा व्हॅली, निलगिरी माउंटन रेल्वे हेरिटेज अशाप्रकारे तीन वर्षात जवळपास 30 हायड्रोजन रेल्वे सुरू करण्याची रेल्वे विभागाची योजना आहे.