Chandra Grahan 2023 : या तारखेला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ आणि सुतक कालावधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chandra Grahan 2023 : जेव्हा चंद्र हा प्रथ्वीच्या पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो त्यावेळी त्याचा सुतक कालावधी नसतो तर जेव्हा चंद्रग्रहण सुरु होणार असते त्याआधी ९ तास हा सुतक कालावधीचा असतो.

नवीन वर्ष २०२३ मध्ये पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. तसेच या वर्षात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण देखील होणार आहे. १० एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी काही खगोलशास्त्रज्ञ यांच्या मते काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

2023 मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील. वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार असून ते रात्री ८.४५ वाजता सुरू होऊन पहाटे १ वाजता संपेल. या दरम्यान, चंद्रग्रहणाचा एकूण वेळ 4 तास 15 मिनिटे असेल. चंद्रग्रहणात सुतक कालावधी वैध नाही. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

2023 सालातील पहिले सूर्यग्रहण

वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे १० एप्रिल रोजी होणार आहे. जे ऑस्ट्रेलिया, पूर्व आणि दक्षिण आशिया, प्रशांत महासागर, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागरातून पाहता येईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

हे सूर्यग्रहण सकाळी 07:04 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:29 वाजता संपेल. या सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधी गृहीत धरता येणार नाही कारण हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही.

28 ऑक्टोबर रोजी दुसरे चंद्रग्रहण

तसेच वर्षातील २०२३ मधील दुसरे चंद्रग्रहण हे शनिवार 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतामधूनही दिसणार आहे. त्यामुळे यादिवशी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते

खंडग्रास हे दुसरे चंद्रग्रहण असेल

28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण खंडग्रास असेल, जे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला अश्विनी नक्षत्रात मेष राशीत असेल. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका, पश्चिम दक्षिण प्रशांत महासागर, अमेरिकेचा पूर्व भाग, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागरात दिसणार आहे.

सुतक कालावधी

ज्या ठिकाणाहून हे चंद्रग्रहण पाहता येईल त्या ठिकाणी सुतक कालावधी असतो. सुतक कालावधी हा ग्रहण सुरु होण्याच्या ९ तास अगोदर असतो. जेव्हा ग्रहण होते तेव्हा राहू आणि केतूची सावली राशींवर पडते, त्यामुळे सुतक कालावधी पाळावा लागतो.

नेहमी ग्रहणाच्या वेळी मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे दरवाजे बंद केले जातात. यासोबतच या काळात खाणे, झोपणे आदी गोष्टींवर बंदी असते. त्यामुळे तुम्हीही आदी गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.