अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज पासून म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारत टी 20 प्रकारात अपराजित असल्याने श्रीलंकेविरुद्धही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडवर, तर तीन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन केले.
माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली, प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून के. एल. राहुल, दीपक चहर दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर,
दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.