नवी दिल्ली आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. मागे पंतप्रधानांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन असू शकते असे संकेत दिले होते.
हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात.
उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू शकते. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सुट राहणार आहे. सद्यस्थितीला राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे.
आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.
त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत.