corona news : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चौथी लाट येण्याच्या भीती व्यक्त केली जात आहे. अशातच कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.. या आधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते.
त्यामुळे त्यांचा हा इशारा गांभीर्याने घेऊन उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या आता वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी ही लाट जूनमध्ये येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो पूर्ण खरा ठरला नसला तरी जूनमध्ये रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाली, हे नाकारून चालणार नाही, अशे तज्ज्ञांचे मत आहे.