Geyser : थंडीचे दिवस सुरु असल्याने अनेकजण अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गिझरचा वापर करत आहेत. अनेक कंपन्यांचे गिझर बाजारात उपलब्ध आहेत. गरम पाण्यासाठी प्रत्येकजण गिझरचा वापर करत आहे. मात्र गिझरबाबत काही चुका तुमच्या जीवावर बेतू शकतात.
गिझरपासून नेहमी सुरक्षित राहिले पाहिजे. गिझरचा वापर काळजीपूर्वक केला पाहजे. जरी बाथरूममध्ये उंच ठिकाणी बसवला असला तरीही त्याच्यापासून तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
गिझरपासून कसे सुरक्षित राहाल
गिझर खरेदी करत असताना अनेक गोष्टी बारकाईने पहिल्या पाहिजेत. गिझरला कोणत्या सोयी देण्यात आल्या आहेत हे तपासले पाहिजे. गळतीमुळे वीजपुरवठा थांबणे, प्लगमध्ये पाणी शिरल्यानंतरही शॉक होत नाही असे अनेक वैशिष्ट्ये असलेला गिझर खरेदी करा.
गिझर खरेदी करताना तो चांगल्या कंपनीचा खरेदी करा. जेणेकरून वॉटर हीटर शॉक प्रूफ हे पहा. असे गिझर अतिदाब आला तरीही टाकी फुटण्यापासून वाचवतात.
कोणते गिझर वापरावे
गिझर खरेदी करताना अनेकजण त्याच्या किमतीकडे पाहतात. मात्र किमतीकडे न पाहता त्याची वैशिष्ट्ये तपासा. तसेच किचनसाठी गिझर घ्यायचा असेल तर 1 लिटर, 3 लिटर आणि 6 लिटरचे गिझर उत्तम. 10 लिटर – 35 लिटरचे गिझर बाथरूमसाठी चांगले मानले जातात.
गिझरचे रेटिंग तपासणे
आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कंपनीचे गिझर बाजारात तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र गिझरचे रेटिंग पाहून गिझर खरेदी करावा. यामुळे तुमच्या विजेची बचत होईल. 5 स्टार गीझर 25 टक्के विजेची बचत करतात.
भारतात असे काही गिझर उपलब्ध आहेत जे मोठ्या आकाराचे असून त्याची किंमत कमी आहे. तसेच त्या गिझरपासून घोका निर्माण होत नाही आणि पाणीही कमी वेळात गरम होते.
गिझर घेतल्यानंतर कंपनी सर्व्हिस देणार कि नाही?
गिझर घेतल्यानंतर अनेक कंपन्या सर्व्हिस देत नाहीत. त्यामुळे तुम्ही अनेकदा अडचणीत सापडू शकता. गिझर घेताना कंपनीची किती वर्ष वॉरंटी देते आणि बाकी गोष्टी तपासल्या पाहिजेत.