राज्यपाल अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

क्षा रद्द करण्याच्या विरोधात मुंबई राज्यातील विद्यापीठ महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेशी राज्यपाल सहमत नाहीत.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं पत्राद्वारे सांगितलं आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 17 मे रोजी युजीसीला पत्र पाठवून सध्या राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाचा विचार करत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता या परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभाग असमर्थ असून आपण या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी असं कळवलं होत.

परीक्षा रद्द करण्याबाबतच पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला लिहिणे म्हणजे युजीसी गाईडलाइन्समध्ये हस्तक्षेप करणं असून महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट 2016 संबंधित तरतुदींचे उल्लंघन असल्याने मुख्यमंत्री यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सूचना द्याव्यात असं देखील या पत्रात राज्यपाल म्हटले आहे.

शिवाय, राज्यपालांच्या म्हणण्यानुसार परीक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पत्र देण्यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी याबाबत मला कोणतेही माहिती दिली नसल्याचं सांगितलंय. कोट राज्यपालांचा गैरसमज झाला असेल तर मी तो दूर करेल.

आम्ही त्यांना विचारत घेतलं नाही किंवा साइड ट्रॅक केलं अस अजिबात नाही. मी युजीसी कडे माझं मत मांडण हा गुन्हा आहे असं मला वाटत नाही.

कोव्हिडची सद्यस्थिती पाहता आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनतुन हा विचार करुन हे मत मांडलं आहे. याआधीच्या परीक्षा रद्द करताना मी राज्यपालांशी चर्चा व्हिडिओ कॉन्फरस्निंग द्वारे केली होती. विद्यार्थ्यांचा कोणतेही नुकसान होणार नाही असाच निर्णय आम्ही घेणार आहे. – उदय सामंत , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

अहमदनगर लाईव्ह 24