शेअर मार्केटबाबत आता बरीच जनजागृती झाली आहे. आता अनेक लोक शेअरमार्केट्मधे गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. एक काळ असा होता की ठराविक लोकच यात गुंतवणूक करू शकत होते. परंतु आता ऑनलाईन जमान्यात शेअर मध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे.
कारभारही बराच पारदर्शी झाला आहे. यामध्ये महिलाही काही मागे नाहीत. एक महिला अशी आहे की जिने एकाच महिन्यात 650 कोटी रुपयांची भरभक्कम कमाई शेअर मार्केटमधून केली आहे. म्हणजेच एकाच महिन्यात या महिलेने 650 कोटी रुपये शेअर्समधून कमावले आहेत. कोण आहे ही महिला? कसे कमावले इतके पैसे? कोणते शेअर्स महिलेने घेतले होते? चला पाहुयात –
शेअर मार्केट सध्या तेजीत :- सध्या मागील काही दिवसांत शेअर मार्केट तेजीत आहे. बीएसई ७० हजाराच्या वर व एनएसई २० हजारांच्या वर पोहचलाय. मागील हप्ताभरात या तेजीचा लाखो लोकांना फायदा झाला आहे.
यातच एका महिलेने शेअर बाजारात 650 कोटी रुपयांची कमाई केली. ही महिला आहे रेखा झुनझुनवाला. त्यांना तीन स्टॉकमधून इतकी प्रचंड कमाई झाली आहे. कोणते हे शेअर्स आहेत ते पाहुयात.
मल्टीबॅगर स्टॉक :- झुनझुनवाला यांच्याकडे लिस्टेड कंपनीचे शेअर असून या शेअरची किंमत तीन महिन्यांत 14 टक्के वाढली असल्याने त्यांना प्रचंड फायदा मिळाला आहे. या हिशोबाने या कंपन्यांनी तीन महिन्यांत 39000 कोटी रुपये कमवलेत.
यात पहिला टाटा मोटर्स डीवीआर. या शेअर्समध्ये 138 टक्के वाढ झाली असून या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची 1.92 टक्के भागिदारी आहे. दुसरी म्हणजे डीबी रियल्टी. यात 2 टक्के भागिदारी आहे.
या कंपनीच्या शेअरमध्ये 108 टक्के वाढ झाली असल्याने यातही त्यांना प्रचंड नफा मिळाला आहे आणि यात सर्वाधिक परतावा देणारा स्टॉक आहे टायटन शेअर. 5.4 टक्के वाटा त्यांचा यात आहे. यावर्षी या शेअरने त्यांना 39 टक्के वाढ दिलीये.
अशा पद्धतीने त्यांनी या महिन्यात तब्बल 650 कोटी रुपये कमवले आहेत. झुनझुनवाला यांच्याकडे वीए टेक वबाग, वॉकहार्ट, जिओजित फायनेंसियल सव्हिसेस, नजारा टेक्नोलॉजीस, करूर वॅस्य बँक आणि मेट्रो ब्रांड्स यांचे देखील शेअर्स त्यात आहेत.