अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी म्हणजेच आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला..कोलकातामधील जोधपूर पार्कमधील तिच्या राहत्या घरी देवदत्त मृतावस्थेत सापडली.
अनेकदा दार वाजवूनही आतून काही न उत्तर आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलवलं. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
आर्याचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाल्याचं सर्वत्र म्हटलं जात होतं. मात्र, तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात तिचा मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे,
शुक्रवारी आर्याचा मृतदेह संशयास्पदरीत्या घरात आढळून आला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. समोर आलेल्या अहवालात आर्याने मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केलं होतं.
तसंच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आर्या मदतीसाठी उठली आणि त्याचवेळी ती जमिनीवर कोसळली.
आर्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेलं रक्तदेखील तिचंच असून जमिनीवर पडल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. आर्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिला हृदयाशीनिगडीत काही समस्या आणि अन्य आजार होते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.