अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-जर तुमचे बजेट नवीन गाडी विकत घेण्याचे नसेल तर काही फरक पडत नाही, आज आम्ही तुम्हाला काही जुन्या बाईक विषयी माहिती देऊ किंवा दुचाकीच्या बजेटमध्ये मिळणारी सेकंड हँड कार बद्दल माहिती देऊ.
यूज्ड कार फर्म ट्रूव्हल्यूवर कमी किमतीमध्ये मारुती सुझुकी अल्टो व्यतिरिक्त झेन एस्टिलो सारखी वाहने आपणास सहज उपलब्ध होतील.
Alto LXI :- 2009 चे मॉडेल असणारी ही मारुती सुझुकी कार ट्रूव्हल्यूवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, ही कार दुसर्या मालकाकडून 90 हजार रुपयांना विकली जात आहे. या कारचे पेट्रोल वेरिएंट उपलब्ध आहे. गेल्या 11 वर्षात ही कार 56,858 किमी चालविली गेली आहे.
Zen Estilo LXI :- या मारुती सुझुकी कारचे 2007 चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे, ही कार पहिल्या मालकाद्वारे 52,300 रुपयांना विकली जात आहे. या कारचेही पेट्रोल वेरिएंट मिळत आहेत, गेल्या 13 वर्षांत ही कार 55,858 किमी चालविली गेली आहे.
Sx4 VXI :- या कारचे 2007 चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे, ही कार दुसर्या मालकाकडून 80,500 रुपयांना विकली जात आहे. या वाहनाचे पेट्रोल वेरिएंट उपलब्ध असून मागील 13 वर्षात ही कार 1,33,050 किलोमीटर धावली आहे.
टीप ;- वरील सर्व गाड्यांची माहिती Truevalue वेबसाइटवरील माहितीनुसार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जुनी कार खरेदी करताना स्वत: गाडीची स्थिती आणि कागदपत्रे तपासा. वाहनाच्या मालकास भेट न घेता किंवा वाहन न तपासता ऑनलाईन व्यवहार करू नका.