अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- मोठ्या दिग्दर्शकाने अपमान केल्याचे अभिनेत्री प्राची देसाईने एका मुलाखतीत सांगितले. तिच्या मते, तिला बोल्ड दिसण्यासाठी फोकस करावा लागेल, असे सांगण्यात आले होते.
सेक्सिस्ट चित्रपटाच्या आॅफर येत होत्या… त्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे मोठी किमत चुकवावी लागली. त्यांनी माझी नकारात्मक प्रतिमा तयार केल्याचे ती सांगते.
प्राची म्हणाली, मी कधी अशा प्रकारच्या बोल्ड चित्रपटात काम करु इच्छित नव्हते आणि त्यासाठी मला इंडस्ट्रीत मोठी लढाई लढावी लागली. सर्वांची इच्छा होती मी हॉट दृश्य करावेत.
अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला प्रतिक्रिया कळवल्या होत्या. बोल्ड भूमिका तुझ्यावर चांगल्या वाटतात, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे मी चित्रपट कमी केले यापासून दूर राहणेच पसंत केले.
यासाठी मला बरेच मोठे ऑफर सोडावे लागले. काही प्रसिद्ध दिग्दर्शकांनी मला कामासाठी विचारणा केली आणि त्यानंतर अपमानही केला. मला सिनेमात काम देऊन ते माझ्यावर उपकार करत असल्याचे त्यांना वाटत होते.