शाही विवाह सोहळा केला आणि झाला कोरोना संसर्ग वराचा कोरोनामुळे मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-शासनाच्या नियमांचे धिंडवडे काढीत शाही विवाह सोहळा नुकताच उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे पार पडला. मात्र या सोहळ्यामुळे वधूसह एकाच कुटूंबामधील ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि धक्कदायक बाब म्हणजे वराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना संक्रमित लोकांवर उपचार केले जात आहेत. १० दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर ४ डिसेंबरला वराचा मृत्यू झाला. वराला ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.

मात्र, त्याची कोरोना टेस्ट झाली नव्हती. यानंतर संशयावरून जेव्हा कुटुंबीयांची कोरोना तपासणी केली गेली, तेव्हा नऊ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, या तरुणाचे २५ नोव्हेंबरला लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच या तरूणाची तब्येत ढासळली आणि 4 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर कोरोना चाचणीत वधूसह ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.यात वधूच्या सासूचा देखील समावेश आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24