7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर पगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगार लवकरच मिळणार आहे.
तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल आणि नवीन वर्षातील महागाई भत्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून १ जानेवारीपासून महागाई भत्ता दिला जाणार आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना DA ३८ टक्के दराने मिळत आहे. जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने डीए मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून प्राप्त झाली आहे.
DA किती वाढणार?
कर्मचाऱ्यांचा मागील DA वाढ ३ टक्के करण्यात आली होती. औद्योगिक कामगारांसाठी दरमहा महागाई भत्ता (DA) ची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे केली जाते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 साठी CPI-IW 31 जानेवारी 2023 रोजी जारी करण्यात आला.
मात्र यावेळी कर्मचाऱ्यांना ४ टक्के DA वाढ मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातील पहिली वाढ देखील झाली नाही. मात्र होळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना गोड बातमी देऊ शकते. DA वाढीमुळे देशातील 68 लाख ज्येष्ठ नागरिकांना आणि सुमारे 47 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
पगारात 90,000 रुपयांची वाढ होऊ शकते
कर्मचाऱ्यांच्या वर्षातील पहिला DA वाढल्यानंतर पगारात देखील बंपर वाढ होणार आहे. जर एखाद्या कर्मचार्याचा पगार 30,000 रुपये असेल, तर त्याच्या एकूण पगारात सुमारे 10,800 रुपयांची वाढ होऊ शकते. दुसरीकडे, जर आपण सचिव स्तराबद्दल बोललो तर कर्मचार्यांच्या वार्षिक पगारात 90,000 रुपये किंवा त्याहूनही अधिक वाढ होऊ शकते.
DA कधी वाढतो?
एक वर्षात २ वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. दार ६ महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मात्र या नवीन वर्षात अजून एकदाही DA वाढवण्यात आलेला नाही. जर ३ टक्के DA वाढ झाली तर ४१ टक्के आणि ४ टक्के झाली ४२ टक्के DA होऊ शकतो.