Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. कानपूर सेंट्रल ते मदुराई दरम्यान धावणारी गाडी आपल्या राज्यातून जाणार असून ही राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देखील घेणार आहे.
विदर्भातील रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असून सणासुदीच्या काळात चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच सोयीचा होईल अशी आशा आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार कानपूर सेंट्रल ते मदुराई विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवाळी आणि छटपूजेच्या निमित्ताने सुरू करण्यात आली आहे. ही गाडी 27 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या काळात या गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी महाराष्ट्रातही थांबणार आहे. राज्यातील विदर्भ भागातील काही स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला नागपूर, चंद्रपूर, बलरशाह, शिरपूर कागझनगर, बेलमपल्ली, मंचिर्याल, रामगुंडम, खम्मम, विजयवाडा, नेल्लोर, गुडूर रेनिगुंता, काटपाडी, जालारपेट्टई, सालेम ईरोड तीरुप्पूर, पोदनूर , किणाटटुक्कडवू या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.