तिसरा टप्पा ! पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे.

तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

पंजाब निवडणूक:-  पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पंजाबमधील सर्व 117 जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजप-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात आहेत.

उत्तर प्रदेश निवडणूक :- उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यांतील 59 मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

तेथेही मतदान होत आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या 59 पैकी 49 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.