भारत

7 th Pay Commission DA Hike Update : प्रतीक्षा संपणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये यादिवशी होणार बंपर वाढ

Published by
Ahmednagarlive24 Office

7 th Pay Commission DA Hike Update : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच केंद्र सरकारकडून नवीन वर्षातील DA वाढ केली जाऊ शकते. आता कर्मचाऱ्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.

होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ होणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र होळीनंतरही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकतात.

१ मार्च २०२३ रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये DA वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप याबाबात केंद्राकडून कोणतेही परिपत्रक काढण्यात आले नाही. तसेच कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

१५ मार्च रोजी देखील नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये DA वाढीची घोषणा मोदी करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवर जाणार

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के आहे. तसेच केंद्र सरकारकडून ४ टक्के महागाई भत्ता वाढवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर जाऊ शकतो. तसेच मागील वेळेस महागाई भत्ता हा ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.

पेन्शनधारकांनाही भेट मिळणार

केंद्र सरकार फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. पेन्शनधारकांनाही महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे. तसेच DR देखील वाढवला जाणार आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढीस मंजुरी देऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office