भारत

संपूर्ण कुटुंबानेच केला आत्महत्येचा प्रयत्न ! सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण वाचून बसेल धक्का

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- भोपाळमध्ये एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण दिलं आहे. आनंदनगरमधील अशोक विहारमधील संजीव जोशीच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची नावं लिहिली आहेत. या सर्वांना त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. बबली ही अशोका गार्डन येथे राहणारी आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी संजीव जोशीची पत्नी अर्चनाने या सर्वांचे नावं आणि मोबाइल नंबर सुसाइड नोटमध्ये लिहिले आहेत. दुसरीकडे संजीव जोशी, त्याची पत्नी अर्चना, आई नंदनी, दोन मुली पूर्वी आणि गिरिश्मा यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेत आतापर्यंत पूर्वी आणि नंदनी यांचा मृत्यू झाला आहे.

अर्चनाने बबलीने केलेल्या अत्याचाराबद्दल सविस्तर माहिती सुसाइड नोटमध्ये दिली आहे. बबलीने आपला खूप छळ केल्याचं तिने म्हटले आहे. बुधवारी बँकेत घरी आल्यानंतर बबलीने घराजवळ गोंधळ घातला. यावेळी उर्मिलाही सोबत होती. व्यवहाराची रक्कम भरण्यासाठी ते त्यांचे घरही विकत होते पण बबलीचा यावर विश्वास बसत नव्हता.

बुधवारी त्यांनी पैसे परत न केल्याचा आरोप कुटुंबीयांवर केला होता. सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, व्यवहाराचे पैसे देण्यासाठी घर विक्रीसाठी करारही झाला होता, मात्र बबलीचा यावर विश्वास नव्हता. तिची मुलगी उर्मिलाने आईला शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांनी फोनवर पूर्वी आणि गिरिश्मा यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती.

या त्रासामुळे कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सुसाइडसाठी विष घेण्यापूर्वी त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे की, 3 लाख 72 हजार रुपये देण्यासाठी ते तयार होते. मात्र तरीही त्यांना अपमानित करण्यात आलं. यानंतर काहीही पर्याय नसल्याचा विचार करून कुटुंबाने आत्महत्येचा निर्णय घेतला.

सुसाइड करणाऱ्या कुटुंबाने राजू राय आणि लक्ष्मी राय यांचं नाव लिहिलं आहे. ज्यात 30 हजार रुपयांच्या उधारावर व्याज दोन लाख वसुल करण्याचं लिहिलं आहे. कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांनी 23 नोव्हेंबर पर्यंत व्याज दिलं आहे. एका दिवसासाठी त्यांच्याकडून 5 रुपये व्याज घेण्यात आलं.

Ahmednagarlive24 Office