पत्नीने पती विरोधात केली तक्रार;कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

एका पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. परंतु याचे कारण मात्र विस्मयकारी आहे. या महिलेचा पती पंजाबमधील भटिंडावरून हरयाणातील हिसारमधील मूळ गावी आला होता.

त्याने कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संदीप हा काही दिवसांपूर्वीच पंजाब भटिंडा मधील तलवंडी येथून परतला होता. तो घरी आल्यानंतर त्याच्यात कोरोनाची काही लक्षणं पत्नीला आढळून आली.

त्यामुळे पत्नीने त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. संदिपने सुरुवातीला नकार दिला.

मात्र पत्नीने कोरोनाची चाचणी करण्याचा तगादा लावल्यानंतर संदिपने तिला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली.

त्यामुळे पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. संदीपचे कोरोना चाचणी साठी सँम्पल घेऊन नंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24