अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे.
मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, तिकीट नसतानाही ही महिला बरंच सामान घेऊन विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती.
सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे.
मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे. सुरक्षारक्षकांनी महिलेला बराच वेळ समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र या महिलेने गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपूरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता चौकशीमध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली.