हे आहेत काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  मास्कची खिल्ली उडवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड्र ट्रम्पदेखील अाता काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या जगभरातील नेत्यांच्या यादीत अालेले अाहेत.

ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानियादेखील काेराेना संक्रमित झाल्या अाहेत. ट्रम्पच्या अगाेदर भारतासह जगभरातील तमाम माेठ्या नेत्यांना काेराेना संसर्ग झाला अाहे.

काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते

बाेरिस जाॅन्सन: काेराेना संसर्ग हाेणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे जगातील पहिले मोठे नेते आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्यांना एप्रिलमध्ये आयसीयूमध्येही ठेवावे लागलेहाेते.

जेयर बोलसोनारो: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी जुलैमध्ये स्वत: ला संसर्ग झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मलेरियामध्ये वापरल्या जाणाऱ्या हायड्राेक्लाेराेक्वीन औषधाचे जाहीरपणे कौतुक केले हाेते.

जुआन अाॅरलंॅड हर्नांडेज: होंडुरासचे राष्ट्रपतींनी ते, त्यांची पत्नी, त्यांच्या बराेबर करणारे दाेन निकटवर्तींय यांच्यासह संसर्ग झाल्याची घाेषणा जूनमध्ये केली हाेती.

जिनीन अनेज: बोलिव्हियाचे हंगामी राष्ट्रपती जिनीन अनेज जुलैमध्ये संक्रमित झाल्या हाेत्या. अापण अापले अाराेग्य चांगलेअसल्याचे त्यांनी सांगितले.

लुइस एबिनडर: डाॅमनिक गणराज्याचे नवनिर्वाचित राष्ट्रपती लुइस एबिनडर अापल्या निवडणूक प्रचार माेहीमे दरम्यान संक्रमित झाले हाेते. जुलैत देशात झालेल्या निवडणुकांच्या अाधी काही अाठवडे विलगिकरणात राहिले हाेते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24