भारत

‘हे’ आहेत भारतातील ग्रीन रेल्वेमार्ग! एकाच वेळी घेता येतो प्रवासाचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव; प्रवासात पाहता येतील सुंदर नजारे

Published by
Ajay Patil

Green Railway Route In India:- भारतीय रेल्वे ही प्रवाशी वाहतुकीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वपूर्ण अशी आहे. एकंदरीत भारताच्या विकासामध्ये भारतीय रेल्वेचे योगदान खूप महत्त्वाचे असून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या रेल्वे मार्गांचे जाळे विकसित करण्यात येत आहे.

भारतातील दुर्गम भागात देखील आता रेल्वे नेटवर्क विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न असून जवळपास देशाच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वीपासून तर पश्चिमे पर्यंत आपल्याला रेल्वेचे जाळे विस्तारले असल्याचे दिसून येते. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात.

या भारतीय रेल्वेच्या बाबतीत जर बघितले तर काही रेल्वे मार्ग प्रवासाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. भारतामध्ये असे काही रेल्वे मार्ग आहेत की त्या मार्गांवरून तुम्ही जर प्रवास कराल तर तुम्ही एकाच वेळी निसर्गाचा आनंदही घेऊ शकतात

व प्रवास देखील पूर्ण करून एकंदरीत तुम्ही तुमचे पर्यटन या माध्यमातून पूर्ण करू शकतात.त्यामुळे तुम्ही एकदा का असेना या रेल्वे मार्गावरून प्रवास करावा. भारतात असलेले हे असे कोणते रेल्वे मार्ग आहेत, ज्यांना ग्रीन रेल्वेमार्ग देखील म्हटले जाते. त्याबद्दल थोडक्यात माहिती बघू.

ही आहे भारतातील सर्वात उत्कृष्ट आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेले पाच हरित रेल्वेमार्ग

1- कांगडा व्हॅली रेल्वेमार्ग( पठाणकोट ते जोगिंदरनगर)- हा रेल्वेमार्ग हिमालयाच्या पायथ्याशी असून तेथील नैसर्गिक सौंदर्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्या या धोलाधर पर्वतराजीतून जातात.

या मार्गावर ट्रेनचा वेग कमी असतो व त्यामुळे तुम्हाला इथले निसर्ग सौंदर्याचे देखावे आरामात पाहायला वेळ मिळतो. या रेल्वे मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला हिमाचल प्रदेशाच्या सौंदर्याची झलक पाहता येते.

2- निलगिरी माउंटन रेल्वे- या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा निलगिरी टेकड्यांमध्ये असून त्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या चहाच्या बागातुन तसेच दऱ्या आणि बोगद्यांमधून जातात.

या मार्गावर तुम्ही पश्चिम घाटाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात व या मार्गावर निलगिरीची घनदाट जंगल आणि चहाच्या मळ्यातून ट्रेन जाते व हा प्रवासाचा अनुभव आयुष्यामध्ये कायम अविस्मरणीय असा ठरतो.

3- कोकण रेल्वे- हा रेल्वेमार्ग पश्चिम घाटातून जातो आणि त्याचे नैसर्गिक सौंदर्य देखील खूप पाहण्यासारखे आहे. कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करताना धावणाऱ्या गाड्या या समुद्रकिनारा तसेच नद्या आणि पर्वतांमधून जातात.

पावसाच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वेमार्ग हा आणखीनच सुंदर दिसतो. दाट हिरवीगार जंगले तसेच पश्चिम घाटाचे सौंदर्य आणि किनारी भागातून जाणारा रेल्वेमार्ग भारतातील ग्रीन रेल्वे मार्गांपैकी महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे.

4- दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमार्ग- हा रेल्वेमार्ग देखील निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असून दार्जिलिंगच्या टेकड्यांमधून जातो व या मार्गाला टॉय ट्रेन म्हणून देखील ओळखले जाते.

दार्जीलिंग हिमालयन रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्या या चहाच्या बागांमधून तसेच बोगदे व दऱ्या खोऱ्यातून जातात.तसेच महत्त्वाचे म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश आहे. दार्जिलिंगला जाणाऱ्या प्रवाशांनी हा रेल्वे प्रवास अवश्य करावा.

5- मंडपम-रामेश्वरम रेल्वेमार्ग- भारतातील हा रेल्वे मार्ग देखील खूप महत्त्वाचा असून तो रामेश्वरम बेटावर जातो आणि भारतातील सर्वात दक्षिणेकडील रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्या समुद्रकिनारी धावतात व त्यामुळे या मार्गाचे दृश्य खूपच मनोहारी व नयनरम्य असते. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून प्रवास करताना खूप मजा येते.

Ajay Patil