केवळ 11,500 रुपयांत ‘येथे’ मिळत आहेत हिरो स्प्लेंडरसह ‘ह्या’ बाईक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- हीरो स्प्लेंडर आणि पॅशन या दोन्ही बाईक खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने अलीकडेच या दोन्ही बाईक्स नवीन बीएस 6 मानकानुसार अद्ययावत करुन बाजारात आणल्या आहेत. याशिवाय या बाइक्समध्ये कंपनीने फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे.

भारतीय बाजारात प्रवासी सेगमेंट बाईकची मागणी नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. परंतु अलीकडे नवीन इंजिन मानकांनुसार आपल्या बाइक्स अद्ययावत केल्या आहेत, त्यानंतर वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली आहे.

अशा परिस्थितीत आपण कमी किंमतीत बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Droomनावाच्या शॉपिंग कमर्शियल वेबसाईटवरुन वापरलेली सेकंड-हँड बाइक खरेदी करू शकता. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर हिरो स्प्लेंडर आणि पॅशन यासारख्या बाईक्स अत्यंत कमी किंमतीला विकल्या जात आहेत.

चला तर मग त्या बाईक्स विषयी जाणून घ्या -;

१) बजाज सीटी 100:- बजाज ऑटोची सर्वात स्वस्त बाईक सीटी 100 त्याच्या खास लुकसह उत्कृष्ट मायलेजसह प्रसिद्ध आहे. याचे एक मॉडेल Droom वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाइक 2015 चे मॉडेल असून आतापर्यंत 42,852 कि.मी.पर्यंत चालली आहे. तीची किंमत फक्त 17,500 रुपये आहे.

२) हीरो स्प्लेंडर प्लस:- देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माता हीरो मोटोकॉर्पची सर्वाधिक विक्री होणारी बाईक स्प्लेंडर प्लस या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिलेल्या माहितीनुसार ही बाईक 2006 मॉडेलची असून आतापर्यंत या बाईकने 25,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही दुचाकी तिच्या तिसर्‍या मालकाकडून विकली जात आहे. तिची किंमत 14,000 रुपये निश्चित केली गेली आहे.

३) हीरो पॅशन प्रो:- हीरोची आणखी एक प्रवासी बाईक पॅशन प्रो देखील या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिलेल्या माहितीनुसार ही बाईक २०११ चे मॉडेल असून आतापर्यंत ही बाईक 29,454 किलोमीटर चालली आहे. तीची किंमत केवळ 11,500 रुपये आहे.

टीपः- येथे दुचाकींबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी Droomवेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आहेत. जुनी वाहने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रे व स्थितीबाबत सखोल चौकशी करणे फार महत्वाचे आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24