असा आहे मुकेश अंबानी यांचा दिनक्रम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र आज आपण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, तसेच दिनक्रमाबद्दल जाणून घेऊ मुकेश अंबानी रोज पहाटे 05 ते 05:30 सुमारास उठतात.

त्यानंतर ते जिममध्ये वर्कआऊट करतात. एंटिलिया या त्यांच्या निवासस्थानीच दुसऱ्या मजल्यावर आलिशान जिम आहे. जिमवरून आल्यानंतर ते स्नान व ध्यान करतात. त्यानंतर साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान ते एंटिलियाच्या 19 व्या मजल्यावर नाश्त्यासाठी पोहोचतात. मुकेश अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहेत.

नाश्त्यामध्ये ते पपईचं ज्यूस, दलिया किंवा दहीसोबत चपाती खातात. सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास ते एंटिलियाच्या १४ व्या मजल्यावर स्वत:च्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात. दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ते ऑफिससाठी घरातून निघतात.

ऑफिसला जाण्यापूर्वी ते पत्नी, मुलांसोबत थोडा वेळ आवर्जून घालवतात. नरीमन पॉईंट इथल्या मुख्य ऑफिसमध्ये ते जवळपास दहा ते बारा तास काम करतात. रात्री 11 च्या नंतर ते घरी परततात. मुकेश अंबानी घरी कितीही उशिरा आले तरी नीता अंबानी त्यांच्यासोबत रात्रीचं जेवण करण्यासाठी थांबतात.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24