अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-एकेकाळी जगभरात लोकप्रिय आणि अव्वल असलेल्या WhatsApp ला टेलिग्रामने मागे टाकले आहे. जगभरात टेलीग्रम हे युजर्सकडून सर्वाधिक डाऊनलोड होणारे ऍप म्हणून पुढे आले आहे.
विशेष म्हणजे टेलिग्रामसोबतच टिक टॉक, सिंग्नल आदी ऍपनी फेसबुक, व्हाट्सऍप यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. जानेवारी 2021 मध्ये टेलिग्राम सर्वात जास्त डाऊनलोड होणारे नॉन गेमिंग अॅप बनले आहे.
एकट्या भारतात टेलिग्रामला 24 टक्के डाऊनलोड मिळाले आहेत. सेन्सर टॉवरच्या ताज्या अहवालानुसार, टेलिग्रामचे गेल्या महिन्याभरात 6 कोटी 30 लाख डाऊनलोड आहेत.
व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीनंतर युजर्स मोठय़ा प्रमाणात टेलिग्रामकडे वळले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये टिकटॉक हे जगातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप होते.
WhatsApp ने नुकतीच आपल्या प्रायव्हसी पॉलिसी बदलून त्यात काही नवे नियम अंतर्भूत केले. त्यामुळे जगभरातील युजर्सच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयकल्लोळ निर्माण झाला.
परिणामी व्हॉट्सॅपच्या धोरणांवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर युजर्सकडून व्हॉट्सऍप अनइन्स्टॉल करण्याची एक लाटच आल्याचे पाहायला मिळाले. याचाच फटका आता व्हॉट्सऍपला मोठ्या प्रमाणावर बसल्याचे पाहायला मिळते आहे.