Hill Station In India:- भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत जर सगळी राज्ये पाहिली तर प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला निसर्गाने नटलेली अनेक सुंदर पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाणे तसेच डोंगर दऱ्या,
पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या तसेच नाले व धबधबे इत्यादी निसर्गाच्या खजिन्याचे मनोहर दृश्य पाहण्यामध्ये वेगळीच मजा असते व त्यामुळे भारतामध्ये लाखोंच्या संख्येने विदेशातील पर्यटक देखील दरवर्षी भेट देतात. परंतु जर आपण भारतामधील हिल स्टेशन बघितले तर या ठिकाणी पावसाळाच नाही तर अगदी उन्हाळ्यात देखील तुम्ही भेट देऊ शकतात
व त्या ठिकाणच्या अलौकिक असे नैसर्गिक सौंदर्य पाहणे म्हणजे एक वेगळाच आनंद आणि स्वर्गसुख मनाला लाभते. जर या पावसाळ्यामध्ये तुम्हाला अशाच काही हिल स्टेशनला जायची गरज असेल तर कुठे लांब जाण्याची गरज नसून आपल्या शेजारी राज्य मध्यप्रदेश राज्यांमध्ये तीन हिल स्टेशन अशी आहेत की त्यांना निसर्गाने भरभरून असे दिले आहे व त्यामुळे लाखोंच्या संख्येने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते.
मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन
1- तामिया हिलस्टेशन– या हिल स्टेशनची उभारणी ब्रिटिश काळात झाली असून हे ट्रेकिंग, फोटोग्राफीची आवड असणारे व्यक्ती तसेच कॅम्पिंग इत्यादींसाठी खूप प्रसिद्ध असलेले हिल स्टेशन असून या ठिकाणचे निसर्गासौंदर्य म्हणजे स्वर्गात फिरण्याचा एक अद्भुत आनंद मिळण्यासारखाच आहे.
तुम्ही जर तामिया हिल स्टेशनला भेट दिली तर त्या ठिकाणी होणारा सूर्यादय आणि सूर्यास्त पाहणे म्हणजे एक पर्वणी असते. या ठिकाणी असलेले पातालकोट, कॅथोलिक चर्च आणि आदिवासी संग्रहालय देखील तुम्ही पाहू शकतात व पावसाळ्याच्या कालावधीत तर या ठिकाणचे सौंदर्य नयनरम्य आहे.
2- ओंकारेश्वर हिलस्टेशन– मध्यप्रदेश राज्यातील आणि देशातील जे काही पवित्र धार्मिक स्थळे आहेत त्यापैकी ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. आपल्याला माहित आहे की देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर या ठिकाणी असून देश विदेशातील पर्यटकांचे हे एक आवडते ठिकाण आहे.
ओंकारेश्वर हे नर्मदा आणि कावेरी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असून ओंकारेश्वर पर्वतांनी वेढलेले आहे. या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आणि धर्माचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.
ओंकारेश्वर सोबत तुम्ही या परिसरात असलेले सिद्धनाथ मंदिर तसेच ओमकारेश्वर मंदिर, काजल राणी गुंफा आणि अहिल्या घाट इत्यादी स्थळांना देखील भेट देऊ शकता.
3- पंचमढी हिलस्टेशन– मध्यप्रदेश राज्यातील सर्वात प्रसिद्ध असलेले जे काही हिल स्टेशन आहे त्यामध्ये पंचमढी याचा पहिला क्रमांक लागतो. मध्यप्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये हे हिल स्टेशन असून भारतामधील जे काही निसर्गाच्या दृष्टीने सुंदर असे ठिकाणे आहेत त्यापैकी पंचमढी हे एक सुंदर ठिकाण आहे.
पंचमढी परिसरामध्ये असलेल्या टेकड्या तसेच मनमोहक निसर्ग सौंदर्य तसेच धबधबे, त्या ठिकाणी असलेल्या गुहा आणि सुंदर जंगल पाहण्यामध्ये एक मजा असते. तुम्ही जर पंचमढीला गेला तर त्या ठिकाणी महादेव हिल्स, प्रियदर्शनी पॉईंट आणि सातपुडा राष्ट्रीय उद्यानाला देखील भेट देऊ शकता.