PPF Account : केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकांसाठी गुंतवुकीच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. अनेक कर्मचारी आणि नोकरदार वर्ग सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत.
या योजनेमधून त्यांना मैच्योरिटीनंतर चांगला परतावा देखील मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास अनेकांचा कर देखील वाचतो. तसेच आर्थिक फायदाही चांगला होतो. पण पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत आहात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी अन्यथा पैसे अडकू शकतात.
पीपीएफ योजना
जर तुम्हालाही केंद्र सरकारच्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एका वर्षात किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये गुंतवणूक करू शकता. या पैशावर सरकारकडून व्याज देखील दिले जाते.
कर बचत
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्ही कर भरत असाल तर तर तुम्हीही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. पीपीएफ योजनेवर वार्षिक आधारावर ७.१ टक्के चक्रवाढ व्याज दिले जात आहे.
कर वाचवण्यासाठी, या योजनेत पैसे गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत पैसे गुंतवून, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवला जाऊ शकतो.
मैच्योरिटी कालावधी
जेव्हाही तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू करता तेव्हा गुंतवणूकदारांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, अन्यथा पैसे अडकू शकतात. वास्तविक, पीपीएफ खात्याची परिपक्वता 15 वर्षे आहे.
PPF खात्यात जमा केलेले पैसे 15 वर्षांनंतरच मिळतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला दीर्घ कालावधीसाठी या योजनेत पैसे गुंतवायचे नसतील तर त्यांनी हे लक्षात ठेवावे, अन्यथा पैसे अडकू शकतात.
ही योजना फक्त दिर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठीच आहे. या लोकांना दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणूक करायचे नसतील त्यांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करू नयेत. अन्यथा यामध्ये तुमचे पैसे अडकू शकतात.