अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- टायगर श्रॉफ त्याच्या अक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने केलेले आतापर्यंतचे चित्रपट खूप चालले आहेत. टायगर श्रॉफ आता नवीनच ठिकाणी काम करताना दिसून येणार आहे.
टायगर श्रॉफ लवकरच ‘कॅसॅनोवा’ नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे . त्या व्हिडिओत त्याच्यासोबत आकांक्षा शर्मा नावाची अभिनेत्री पण दिसणार आहे. आकांक्षा शर्मा यच्याआधी पण व्हिडीओ गाण्यांमध्ये दिसलेली आहे.
त्याच्याआधी तिचा ‘आय एम डिस्को डान्सर’ नावाचा म्युझिक अल्बम येऊन गेलेला आहे. आकांक्षा शर्माचे टायगर श्रॉफ सोबतचे गाणे आता रिलीज झाले आहे.
आकांक्षा शर्मा तिच्या बिचवरच्या बिकिनी फोटोनी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली.तिचे बीचवरचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
आकांक्षा शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावर हॉट फोटो टाकत असते. आकांक्षा शर्मा सगळ्याच बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग आहे,.