Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Top 5 Car : १ एप्रिलपासून बंद होणार या टॉप ५ कार, यादीत तुमच्या तर कारचे नाव नाही ना? पहा यादी

१ एप्रिलपासून देशातील टॉप ५ कार बंद होणार आहेत. सरकारच्या नियमानुसार या कार बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या कारचे मॉडेल यामध्ये आहे का ते एकदा तपासा.

Top 5 Car : देशभरातील ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्या नवनवीन कार बाजारात सादर करत आहे. तसेच सरकारच्या BS6 नियमांनुसार कंपन्यांना कार उत्पादन करावे लागत आहेत. पण आता सरकारकडून जुन्या वाहनांसाठी अनेक नियम आणले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारकडून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी BS6 इंजिन असणाऱ्या कार निर्मिती करण्याचे आदेश ऑटो कंपन्यांना दिले आहेत. BS6 इंजिनमुळे CO2 उत्सर्जन कमी करण्यास मदत होते आणि प्रदूषण देखील कमी होते.

BS6 इंजिन हे अधिक कार्यक्षम देखील आहे आणि CO2 उत्सर्जन कमी करण्यास मदत करत असल्याने दुहेरी फायदा होत आहे. त्यामुळे सर्व कंपन्या BS6 इंजिन असलेल्या कार आणि बाईक निर्मिती करत आहेत.

हे न केल्यास होईल दंड

जर एखाद्या कंपनीने सरकारच्या नियमानुसार BS6 इंजिन असलेली कार किंवा बाईक निर्मिती न करता जुने इंजिन असलेली कार सादर केली तर ती सरकारद्वारे बाद केली जाईल आणि तसेच जर असे कोणी करत असेल तर त्याला दंड देखील केला जाईल.

त्यामुळे आता सर्व कंपन्यांना BS6 इंजिन अपग्रेड करणे बंधनकारक केले आहे. जर असे न केल्यास त्वरित वाहनांची विक्री थांबवावी लागेल. त्यामुळे अनेक कंपन्यांनी जुन्या कारचे उतपादन थांबवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारचे इंजिन नवीन नियमांनुसार अपडेट केलेले नाही. मारुती सुझुकी अल्टो 800, Honda WRV, Honda Jazz, Honda City 4th gen आणि Nissan Kicks आहेत. यामुळेच कंपन्या या गाड्यांचा स्टॉक संपवत आहेत.

त्यामुळे कंपन्यांकडून आता या कारचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. तसेच ज्या जुन्या कारचा स्टॉक आहे तो संपण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आता BS6 इंजिनमुळे किमती देखील वाढण्याची शक्यता आहे.

निसान किक्सचे बुकिंग बंद

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल कंपनी निसानने आपल्या निसान किक्स मॉडेलची विक्री बंद केली आहे. यानंतर लवकरच, कंपनी या सेगमेंटमध्ये Bs6 इंजिनसह एक नवीन SUV लॉन्च करणार आहे.

वाहनांच्या किमती 50 हजारांपर्यंत वाढू शकतात

नव्या नियमानुसार सर्व वाहनांना त्यांचे इंजिन अपग्रेड करावे लागणार आहे. त्यामुळे या नवीन अपडेटेड इंजिन वाहनाची किंमत पूर्वीच्या तुलनेत 50 हजार रुपयांनी वाढू शकते.