Top Mileage Bike : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनके कंपन्यांच्या बाईक जबरदस्त मायलेज देत आहेत. तसेच अशा बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात हिरो, TVS आणि बजाज कंपनीच्या बाईक अधिक लोकप्रिय आहेत.
अनेकजण बाईक खरेदी करत असताना मायलेज पाहून बाईक खरेदी करतात. तुम्हालाही जबरदस्त मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हिरो, TVS आणि बजाज कंपनीच्या बाईक सर्वोत्तम ठरू शकतात.
Hero HF 100
हिरो कंपनीच्या अनेक बाईक भारतीय ऑटो मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच या कंपनीच्या बाईक कमी किंमत आणि धमाकेदार फीचर्ससाठी ओळखल्या जातात. HF 100 या बाईकला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
HF 100 या बाईकमध्ये दोन मॉडेल सध्या उपलब्ध आहेत. HF 100 या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 56968 रुपये आहे. या बाईकमध्ये 97.2cc इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8PS ची पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते.
Bajaj CT110X
बजाज कंपनीच्या बाईक देखील अधिक लोकप्रिय आहेत. बजाज CT110X बाईक देखील कमी वेळात अधिक लोकप्रिय झाली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 59,104 रुपये आहे.
या बाइकमध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक कार्ब्युरेटरसह 115.45cc एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 8.6PS पॉवर आणि 9.81Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे
बजाज CT110X मोटरसायकल समोर ड्रम ब्रेकिंग सिस्टीम आणि मागील चाकावर कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसह येते. याशिवाय या बाइकमध्ये क्रॅश गार्ड, गेटेड फोर्क, ब्रेस्ड हँडलबार, हेडलाइट गार्ड, दोन्ही बाजूंना फ्लॅट फूट रेस्ट असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. बाईक ट्विन पॉड अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे आणि त्यात एक स्पीडोमीटर आणि एक इंधन गेज देखील आहे.
TVS Sport
TVS स्पोर्ट बाईक देखील भारतीय ऑटो मार्केटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. TVS स्पोर्ट बाईकची एक्स शोरूम किंमत 63990 आहे. या बाईकमध्ये 109.7cc सिंगल-सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 8.29PS च्या पॉवरसह 8.7Nm टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये अनके धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आलिया आहेत. तसेच ही बाईक मायलेजच्या बाबतीत देखील उत्तम आहे. TVS स्पोर्ट बाईक 90 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. ही बाईक डिजिटल कन्सोल, एलईडी हेडलाइट, ओडोमीटर, अॅनालॉग स्पीडोमीटर अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.