भारत

भारतातील ‘या’ शहराला म्हणतात व्हेनिस ऑफ द ईस्ट! हिवाळ्यामध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत करा ट्रीप प्लान; मिळतील पाहायला अनोखे नजारे

Published by
Ajay Patil

White City In India:- भारत हा विविधतेत एकता असलेला देश असून ही विविधता आपल्याला भौगोलिक तसेच सामाजिक, तसेच प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या विविध बोलीभाषा आणि प्रत्येक राज्याच्या असलेल्या परंपरा यासारख्या बऱ्याच गोष्टींमध्ये दिसून येते. इतकेच नाही तर भारताला मोठी ऐतिहासिक परंपरा देखील लाभली असून तुम्ही कुठल्याही राज्यांमध्ये गेला तरी तुम्हाला समृद्ध अशा ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.

तसेच भारतातील अनेक शहरे ही त्या ठिकाणी असलेली ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक व इतर वैशिष्ट्यांमुळे विशिष्ट अशा नावांनी ओळखले जातात. उदाहरणच घ्यायचे झाले तर ज्याप्रमाणे राजस्थान मधील जयपुरला शहर पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर म्हणून ओळखतात व याच राजस्थान राज्यातील कालीबंगा हे ब्लॅक सिटी म्हणून ओळखले जाते.

म्हणजेच त्या त्या ठिकाणी असलेल्या वैशिष्ट्यांवरून अशी विशिष्ट अशी नावे शहरांना देण्यात आलेली आहेत व त्यांची वैशिष्ट्ये इतर शहरांपेक्षा वेगळी देखील आहेत. याच पद्धतीने जर आपण राजस्थान मधीलच एक शहर बघितले तर त्याला व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाते व या शहराला व्हाईट सिटी म्हणून देखील ओळखतात.

हे शहर देखील राजस्थान राज्यात असून त्या शहराचे नाव म्हणजे उदयपूर हे होय. उदयपूर हे ऐतिहासिक दृष्ट्या तर समृद्ध आहेच परंतु इतर अनेक ऐतिहासिक असे स्थळे त्या ठिकाणी असल्यामुळे पर्यटनासाठी देखील उदयपूर एक प्रसिद्ध असे शहर आहे.

काय आहे उदयपूर या शहराची वैशिष्ट्ये?
उदयपूर शहराला व्हाईट सिटी म्हणून देखील ओळखले जाते व याच शहराला व्हेनिस ऑफ द ईस्ट असे देखील म्हणतात. या शहरामध्ये जर तुम्ही बघितले तर हे शहर सुंदर तलाव तसेच राजवाडे इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

परंतु या ठिकाणाच्या इमारती या पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवलेल्या असल्याने हे संपूर्ण शहर वरून जर बघितले तर पांढऱ्या रंगाचे दिसते व त्यामुळे त्याला व्हाईट सिटी म्हणतात. उदयपूर शहराची स्थापना 1559 मध्ये राजपूत घराण्याच्या सिसोदिया कुळातील महाराणा उदयसिंग यांनी केली होती.

या ठिकाणी मनमोहक असे सुंदर तलाव आहेतच व शाही राजवाडे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी देशातीलच नाहीतर परदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. भारतात प्रसिद्ध असलेले सिटी पॅलेस देखील या ठिकाणी आहे व यालाच उदयपुर सिटी पॅलेस असे देखील म्हटले जाते.

उदयपूर या ठिकाणी असलेला सिटी पॅलेस हा पिचोला तलावाच्या काठावर असून याशिवाय या ठिकाणी प्रसिद्ध असलेला लेक पॅलेस, जगमंदिर इंडो आयर्न जगदीश मंदिर, सहेलीयो की बारी किंवा मेडन्सचे गार्डन, सज्जनगड पॅलेस किंवा मान्सून पॅलेस आणि जयसमंद तलाव तसेच ढेबर तलाव इत्यादी अनेक स्थळे लोकप्रिय असून पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

आपल्याला माहित आहे की प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा जे आम आदमी पार्टीचे नेते आहेत. या दोघांचा विवाह उदयपूर या ठिकाणीच पार पडला होता व त्यानंतर मात्र हे शहर पुन्हा एकदा खूप चर्चेत आले होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचा विवाह उदयपूर शहरातील लीला पॅलेसमध्ये झाला होता.

Ajay Patil