Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Traffic New Rule : वाहतुकीच्या नियमांत बदल! नियम मोडल्यास होईल 25,000 रुपयापर्यंतचा दंड, जाणून घ्या नवीन नियम

Traffic New Rule : देशभरातील वाहतुकीबाबत सरकारकडून काही नियम बनवण्यात आले आहेत. जर हे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड देखील आकाराला जातो. अनेकजण वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम मोडतात अशा लोकांकडून दरवर्षीं लाखो रुपयांचा दंड आकाराला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या देशभरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.

चारचाकी, दुचाकी, स्कूटर चालकांकडून सर्वाधिक वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांकडून वाहतूक पोलीस दंड वसूल करत असतात. त्यामुळे वाहन चालवताना आता नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

नवीन वाहतूक नियमांनुसार मोठा दंड आकारण्यात येणार आहे

सरकारकडून दिवसेंदिवस वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. आता सरकारकडून मॉडिफाईड बाइक्स आणि स्कूटर बद्दल नवीन नियम जारी केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मॉडिफाईड बाइक्स असणाऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा विचार सुरु आहे.

तसेच जर वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केले जाऊ शकते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

कोणत्या उल्लंघनासाठी किती शुल्क?

मॉडिफाईड बाइक्स दंड

जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाईड करण्याचा विचार करत असाल तर लवकरच सावध व्हा. कारण आता मॉडिफाईड बाइक्स असणाऱ्यांना बाईक्स वर वाहतूक पोलिसांची नजर आहे. जर असे केल्यास तुमच्याकडून 5,000 रुपयांचा दंड आकाराला जाऊ शकतो. तसेच सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मॉडिफाईड सायलेन्सर

तुम्हीही तुमच्या बाईकचा सायलेन्सर मॉडिफाईड केला असेल त्वरित तो हटवून टाका. कारण आता BS6 सायलेन्सर नसतील तर वाहन धारकांकडून 10,000 रुपयांपर्यतचा दंड आकाराला जाऊ शकतो.

फॅन्सी नंबर प्लेट

वाहतुकीच्या नियमानुसर आरटीओ विभागाकडून देण्यात आलेली नंबर प्लेट बाईक किंवा कोणत्याही वाहनाला असावी. जर तुमच्या बाईकला फॅन्सी नंबर प्लेट असेल तुमच्याकडून दंड कराल जाऊ शकतो.