भारत

Travel Tips : उन्हाळ्यात या ३ पर्यटन ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन असेल तर जरा थांबा, तुमची सहल होऊ शकते खराब

Published by
Ahmednagarlive24 Office

Travel Tips : या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही चुकूनही भारतातील या ३ पर्यटन स्थळांना भेट देऊ नका. कारण उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी जास्त उष्णता असू शकते. त्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणी गेल्यांनतर त्रास होऊ शकतो.

तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला जात असताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असते तसेच ऊन जास्त असल्याने उष्णता देखील असते त्यामुळे थंडगार हवेची ठिकाणे नेहमी निवडावीत. तसेच ज्या ठिकाणी जास्त उष्णता असेल अशा ठिकाणी कधीही फिरायला जाऊ नये.

उन्हाळ्याच्या दिवसांत भारतातील अनेक सुंदर हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊ शकता. मात्र अनेक ठिकाणी उष्णता असल्याने तुम्ही त्या ठिकाणी जाण्याचे नक्कीच टाळा. कारण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

या ३ ठिकाणी जाणे टाळा

ताज महाल

अनेकांचे ताज महालला भेट देणायचे स्वप्न असते. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहालला भेट देण्यासाठी येत असतात. पण तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी सहलीचे नियोजन करू शकता. उन्हाळ्यात चुकूनही या ठिकाणी सहलीचे नियोजन करू नका. कारण या ठिकाणचे तापमान खूपच वाढते.

जैसलमेर

राजस्थानमध्ये अनेक सुंदर पर्यटन ठिकाणे आहेत. या ठिकाणी देशातीलच नव्हे तर विदेशातील देखील पर्यटक येत असतात. मात्र तुम्ही या ठिकाणी थंडीच्या दिवसांत फिरायला जाऊ शकत. उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान खूपच असते. त्यामुळे तुमची सहल खराब होऊ शकते.

गोवा

गोव्यामध्ये अनेकजण दरवर्षीं भेट देत असतात. या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. भारतातील हे एक सुंदर पर्यटन ठिकाण आहे. पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये या ठिकाणे जाणे टाळा. कारण या ठिकाणचे देखील तापमान खूपच वाढते. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

Ahmednagarlive24 Office