turkey : तीन दिवसात 550 वेळा भूकंप, 10 हजारांवर मृत्यूचा आकडा, तुर्कीत 3 महिने आणीबाणी..

Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भूकंप किती मोठा होता याचा प्रत्येय येतोय.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने अनेकांचे जीव गेले आहेत. सर्वत्र आरडाओरडा आणि ढिगाऱ्यांमध्ये निरागस चेहरे आपल्या घरच्यांना शोधत आहेत. हा भूकंप इतका जोरदार होता की त्यामुळे तुर्की १० फुटांपर्यंत घसरले आहे.

इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ कार्लो डोग्लिओनी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की तुर्कीच्या टेक्टोनिक प्लेट्स सीरियाच्या तुलनेत 5 ते 6 मीटरने पुढे जाऊ शकतात. तुर्की प्रत्यक्षात अनेक मुख्य फॉल्टलाइनवर स्थित आहे. हे अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांना जोडलेले आहे. त्यामुळेच येथे भूकंपाचा धोका सर्वाधिक आहे.

Advertisement

सोमवारी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंप झाला. तुर्कीत सोमवारपासून आतापर्यंत 550 वेळा भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे.

तसेच येथील शाळांना 13 फेब्रुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतासह 70 देशाने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. 15 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा भूकंप अत्यंत शक्तीशाली होता. तो इतका की भूकंपामुळे संपूर्ण तुर्की देश 10 फुटाने सरकला आहे.

Advertisement