अहमदनगर लाईव्ह 24 टीम / चेन्नई ;- एका ४२ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या माजी प्रियकराला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.आरोपी अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या घरी एक्स बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दांडा आणि हातोडा घातला.
हे वाचा :- हॅपी एंडिंग’ कोड सांगितल्यावर मिळायच्या सेक्ससाठी मुली !
दरम्यान पोलिसांनी या हत्ये प्रकरणी तिचा पती बी. शंकरला देखील ताब्यात घेतले आहे. शिवाय अभिनेत्री बहिण एस. लक्ष्मी आणि पती सवरियारला सुद्धा ताब्यात घेतले आहे. देवीचा माजी प्रियकर पुन्हा नात्याची मागणी करत होता.परंतु, देवीला हे नातं मान्य नसल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
हे वाचा :- आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?
देवीच्या माजी प्रियकराचे नाव एम रवी असं होतं. एम. रवि हा 38 वर्षांचा चित्रपटात टेक्नीशन म्हणून काम करायचा.पोलिसांच्या सांगण्यानुसार, ८ वर्षांपूर्वी मदुरई या ठिकाणी त्यांची मैत्री झाली. कलांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. देवी मालिकांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम करत होती.
हे वाचा :- विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर
२ वर्षांपूर्वी देवीच्या पतीला तिच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळाले.तिच्या पतीने आणि कुटुंबाने देवीला तिच्या प्रियकरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रवीने देवीचा शोध घेतला आणि नात्याची मागणी केली.रविवारी रवि देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी पोहोचला आणि लक्ष्मीला पुन्हा एकत्र येण्याचा आग्रह धरला.
हे वाचा :- अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !
लक्ष्मीने देवीला बोलावले, त्यानंतर देवी आणि तिचा नवरा तिथे पोहोचले. देवीला पाहून रविने आपली मागणी केली, ज्यामुळे भांडण सुरू झाले. तेव्हा रागाच्या भरात तिने रवीला जीवे मारले आणि अखेर पोलिसांत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.