Electric Scooter : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत. तसेच इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने ग्राहकही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे आकर्षित होत आहेत. आता आणखी दोन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च झाल्या आहेत.
EV मोबिलिटी टेक कंपनी Yulu ने दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. युलू आणि बजाज या दोन कंपन्यांची भागीदारी आहे. त्यामुळे चेतक टेक्नॉलॉजीज लिमिटेडने विकसित केलेल्या कंपनीच्या या मॉडेल्सना मिरॅकल जीआर आणि डेक्स जीआर अशी नावे देण्यात आली आहेत.
युलू मिरॅकल जीआर आणि डेक्स जीआर स्पीड
या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मिरॅकल GR आणि DeX मॉडेल एकाच प्लॅफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर कंपनीकडून देण्यात आला आहे.
या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने ताशी २५ किमी इतके टॉप स्पीड देण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हब-माउंट मोटर बसवण्यात आली आहे. तसेच एक एलईडी हेडलाइट, एलईडी टेल-लॅम्प आणि सेंटर स्टँड देण्यात आले आहे. पाठीमागील बाजूस रॅक जोडण्यात आला आहे, ज्याची क्षमता 15 किलो आहे.
कंपनीचे आउटलेट आहे अशा ठिकाणी 50,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने वितरित करण्यात आली आहेत. कंपनीचे आउटलेट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.
युलूच्या सामायिक प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या 50,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने वितरित केली गेली आहेत. युलू आपल्या प्लॅटफॉर्मवर मोबिलिटी सोल्यूशन्स ऑफर करण्याचा दावा करते. ज्यामध्ये चालणारी किंमत पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत 40% कमी आहे.
100 पेक्षा जास्त बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उपलब्ध
युलू कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी बेंगळुरू, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास १०० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आहेत. 2024 पर्यंत या स्थानकांची संख्या 500 पर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे.
जर तुम्हाला युलू बाईकी शोधायची असेल तर तुम्ही कंपनीकडून तयार करण्यात आलेले ॲप वापरू शकता. ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला हेल्मेट आणि लायसन्सची गरज नाही.
Yulu ॲप वापरून तुम्ही तुमच्या जवळील Yulu वाहन शोधू शकता आणि ते अनलॉक करण्यासाठी तुम्हाला बाईक पॅनलवरील QR कोड स्कॅन करावा लागेल. राइड सुरू केल्यानंतर, तुम्ही ॲपद्वारे तुमची बाइक पार्क आणि लॉक करू शकता.