बर्ड फ्लू आणि चिकनबाबत अफवा परवणाऱ्या दोघांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-बर्ड फ्लू आणि चिकनबाबत फुकटच्या अफवा पसरवाल तर खबरदार! कारण, बर्ड फ्लू आणि चिकनबाबत अफवा परवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सायबर शाखेने ही कारवाई केली आहे. पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, सोशल मिडीयावर मात्र अफवा पसरविल्या जात आहेत.

त्या या संसर्गापेक्षाही जास्त घातक आहेत. अफवा पसरवणाऱ्या दोघांविरोधात सायबर शाखेकडे गुन्हा नोंदवून त्यांना उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी व चिकन ही मोठ्या प्रमाणात प्रथिनांचे स्त्रोत आहेत. ती खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नसून,

नागरिकांनी बिनधास्त अंडी-चिकन सेवन करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व मत्स्य विकास मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना केलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24